इंग्लंड दौर्‍यापूर्वी सर जडेजांची खास तयारी, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्ट पुढील साडेतीन महिन्यात टीम इंडिया खेळणार आहे. या दौर्‍यात निवड झालेले टीम इंडियाचे खेळाडु तयारीला लागले आहेत. भारतीय संघाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा या दौर्‍याची जय्यत तयारी करतांना दिसुन येतोयं. जडेजानं एका विशेष अभ्यासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रदिर्घ काळानतंर जडेजानं दुखापतीनंतर आयपीएल मध्ये कमबॅक केले. चेन्नई सुपर किंग्सच्या या ऑलराऊंडरला घोडेस्वारीचा छंद आहे. त्याच्याकडे देखील अनेक चांगले घोडे असून क्रिकेटमधून वेळ मिळाला की तो घोडेस्वारीचा हमखास आनंद घेतो. त्याने नुकताच घोडेस्वारी करतानाचा व्हिडीओ शेअर केलायं. सध्या रायडिंग स्किल चांगले करत आहे, असं कॅप्शन जडेजानं या व्हिडीओला दिले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindra jadeja (@ravindra.jadeja)

 

 

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाचे काही खेळाडू सध्या मुंबईमध्ये क्वारंटाईन झाले आहेत. उर्वरित खेळाडू 24 मे रोजी बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर 2 जून रोजी विशेष विमानानं टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे. 18 जून पासून न्यूझीलंड विरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सुरु होणार आहे.

 

You May Also Like

error: Content is protected !!