अमेरिकेत विचित्र बुरशी आजाराने साप संकटात

न्यूयॉर्क । अमेरिकेतील निसर्गतज्ञ आजकाल विशेष चिंतेत पडले असून या चिंतेचे कारण आहे तेथील सापांना होत असलेला विचित्र आजार. करोना विषाणू मुळे अवघे मानवी जीवन संकटात आले असतानाच प्राणी जगतावर आलेले हे संकट निसर्गतज्ञांना बुचकळ्यात टाकते आहे. येथील सापांना विचित्र फंगस म्हणजे बुरशीची लागण होत असून त्यामुळे सापांचे रूप राक्षसाप्रमाणे होऊ लागले आहे. याचा भविष्यात वाईट परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

निसर्गाशी केलेला खेळ मानव जातीप्रमाणे प्राण्यांच्याही जीवावर आला असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. सापांमध्ये आढळत असलेल्या या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे सापाचे रूप बदलत आहे. ही एक प्रकारची त्वचेवर परिणाम करणारी बुरशी आहे. त्यामुळे सापांच्या त्वचेवर काटे आल्यासारखे उंचवटे दिसत आहेत. युएस जिऑलॉजिकल सर्व्हेच्या प्रेस रिलीज नुसार या फंगस मुळे सापांच्या त्वचेवर सूज येणे, त्वचा कोरडी पडणे, डोळे जाणे अशी लक्षणे दिसत आहेत. त्वचेवर आलेल्या उंचवटामुळे साप भयंकर दिसत आहेत. फेसबुकवर या संदर्भातले फोटो शेअर केले गेले आहेत.

You May Also Like