‘अधीश’ बंगल्यातील काही बांधकाम बेकायदेशीर ; नारायण राणेंची याचिका फेटाळून दिलासा नाकारला

मुंबई : मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यातील काही भाग हे बेकायदेशीररित्या आहेत. त्यामुळे ते पाडण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने बजावलेली नोटीस राजकीय सूडबुद्धीने पाठवल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे निरीक्षण नोंदवून मुंबई महानगरपालिकेच्या नोटिशीविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने राणे यांची याचिका फेटाळून लावत त्यांना दिलासा नाकारला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like