करोना काळात अनेकांसाठी देवदूत बनलेल्या सोनू सूदला करोनाची लागण

मुंबई : करोना सारख्या भयानक  संकटात अनेकांच्या मदतीसाठी निस्वार्थपणे धावून आलेला आणि अनेकांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूदला करोनाची लागण झाली आहे. करोना काळात सोनू सूदने देवदूत बनून लोकांना प्रचंड मदत केली आहे. करोनाची लागण झाल्याची माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर दिली आहे.

सोनू सूदने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यात लिहिले की, नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी कोव्हिड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजी करण्याची गोष्ट नाही. उलट, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माझ्याकडे आता आधीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, कोणत्याही अडचणीत..मी तुमच्यासोबत आहे.

तसेच, सोनू सूदला करोना झाल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटत आहे आणि ते काळजी घ्यायला सांगत आहेत. त्याची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

 

You May Also Like