छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘त्या’ एकेरी उल्लेखाबद्दल ‘सोनी वाहिनीची’ माफी

मुंबई : कौन बनेगा करोडपती’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संतापाची लाट उसळल्यानंतर ‘सोनी वाहिनी’ने सपशेल माफी मागितली आहे. स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये शिवरायांचा ‘शिवाजी’ असा उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती.

अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केल्याचे म्हणत शिवप्रेमींनी अमिताभ बच्चन यांना जाब विचारत त्यांच्यावर ताशेरे ओढले. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरायला लागली.

हे प्रकरण अधिक चिघळण्याआधीच सोनी वाहिनीकडून माफीनामा जारी करण्यात आला आहे. ‘केबीसीच्या कालच्या भागात, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनवधानाने एक चूक झाली, ज्याबद्दल आम्हाला खेद वाटतो आहे.’ असं म्हणत सोनी वाहिनीने जनतेची माफी मागितली आहे

या ट्वीटसोबत स्क्रोल चालवल्याचा व्हिडीओही शूट करुन पोस्ट करण्यात आला आहे. तर केबीसीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनाही टॅग करण्यात आलं आहे. शिवरायांच्या एकेरी उल्लेखाबद्दल चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांच्याही माफीची मागणी केली होती. त्यामुळे बिग बी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हा प्रश्न आला होता विचारण्यात  

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये गुजरातची शाहेदा चंद्रन ही स्पर्धक हॉटसीटवर बसली होती. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले होते.

ए. महाराणा प्रताप
बी. राणा सांगा
सी. महाराजा रणजीत सिंह
डी. शिवाजी

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.