लवकरच तुमची कार धावेल 60 रुपये प्रतिलिटर दरात, मोदी सरकारचा नवा प्लॅन

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांचं कंबरडं मोडत असताना इंधनाबाबत दिलासादायक योजना आकाराला येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या बंधनातून मुक्त करत इंधऩाचा नवा पर्याय लवकरच भारतीयांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नव्या इंधऩाची निर्मिती सुरू करण्यासाठी आराखडा तयार केला असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
—–कसं असेल नवं इंधन?
—–या नव्या इंधनाचं नाव आहे फ्लेक्स फ्युएल
यापूर्वी फ्लेक्स कारबाबत अनेकांनी वाचलं किंवा ऐकलं असेल. मात्र फ्लेक्स फ्युएल ही अऩेकांसाठी नवी संकल्पना आहे. हे वेगळ्या पद्धतीनं तयार केलं जाणारं पर्यायी इंधन असणार आहे. इथेनॉलसोबत मिक्स केलेल्या इंधनावर गाड्या चालवण्याची सोय यात असणार आहे. फ्लेक्स फ्युएल हे इथेनॉल, गॅसोलिन आणि मिथेनॉल यांच्या मिश्रणातून तयार झालेला एक वैकल्पिक इंधन प्रकार असणार आहे. फ्लेक्स इंधन हे मूलतः पेट्रोल इंजिनासाठी तयार करण्यात येईल, मात्र त्यासाठी फ्लेक्स फ्युएल इंजिन असणं गरजेचं असणार आहे.
—–फ्लेक्स फ्युएल इंजिन
प्रत्येक इंजिन हे विशिष्ट इंधनावर चालणारं असतं. काही इंजिन ही पेट्रोलवर चालतात, काही डिझेलवर. तर फ्लेक्स इंजिनासाठी पेट्रोल इंजिनातच काही सुधारणा कराव्या लागतील. त्यासाठी तशा प्रकारचं इंजिन गाड्यांमध्ये बसवणं हे कार आणि बाईक बनवणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक केलं जाणार आहे. या गाडीच्या टाकीत पेट्रोलही टाकता येईल आणि फ्लेक्स फ्युएलही टाकता येईल. हे दोन्ही पर्याय एकाच वेळी ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
—–बायो इंजिनापेक्षा वेगळेपण
बायो इंजिनापेक्षा फ्लेक्स इंजिन हा वेगळा आणि आधुनिक प्रकार आहेत. बायो फ्युएल इंजिनात त्यासाठी वेगळी टाकी बसवावी लागते. मात्र या प्रकारच्या इंजिनात एकाच टाकीत वेगवेगळ्या प्रकारचं इंधन टाकता येऊ शकतं.
—–दर होणार कमी
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असले, तरी या नव्या इंधनाचे दर 60 रुपयांच्या घरात असू शकतील. यामुळे सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर फ्लेक्स फ्युएलदेखील विक्रीसाठी उपलब्ध केलं जाणार आहे.

You May Also Like