नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांचा (मान्सून) यंदा अंदमान ते महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास वेगाने झाला

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांचा (मान्सून) यंदा अंदमान ते महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास वेगाने झाला. मात्र ,मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच त्याचा वेग मंदावला होता. नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून पुण्यात दाखल झाला असून पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. पुणे येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे.
पुण्यासह दक्षिण महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सून दाखल

पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वेळेआधीच दाखल झालेला मान्सून दोन दिवसांपासून स्थिर होता. मात्र, बंगालच्या उपसागरात दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सून वार्‍यांना पुन्हा चालना मिळणार आहे.

अंदमान बेटांसह केरळातील आगमन लांबल्याने मान्सून यंदा 3 जून रोजी दक्षिण केरळात दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मान्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून पुण्यात दाखल झाला. पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज, असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

विदर्भात 15 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र, हवामान विभागाला हुलकावणी देत, आधीच मान्सून विदर्भात पोहचला. हवामान विभागानं विदर्भात मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलंय. 11 तारखेपासून 13 तारखे पर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. मान्सूनच्या आगमनानं शेतकरी आणि सर्वसामान्य सुखवलाय. सोबतच या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक डॉ. मनमोहन साहू यांनी याविषयी माहिती दिली आहे.

You May Also Like