विरोधकांच्या गोंधळानंतर सभापती व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर

  नवी दिल्ली | विरोधकांनी तीन कृषी कायद्यांचा विरोध करताना राज्यसभेत मंगळवारी जोरदार गदारोळ घातला. काही खासदारांनी तर चक्क बाकावर उभे राहत विरोध दर्शवला. या संपूर्ण घटनेनंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे आज सभागृहात भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

   दरम्यान या सर्व प्रकारामुळे नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. मला फार वाईट वाटले आहे. खूप दु:खही झाले. मात्र हे दु:ख व्यक्त करण्यासाठी काय करावं मला कळलं नाही. कारण मी रात्रभर झोपलो नाही. हे सगळं घडण्यामागे नेमकं काय होतं हे मला समजत नाही आहे. असे त्यांनी भावूक होऊन म्हटले. दरम्यान राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर व्यंकय्या नायडू कारवाई करणार आहेत. याच मुद्द्यावर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सभागृह नेते पियूष गोयल आणि इतर भाजपा खासदारांनी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली होती.

You May Also Like