कोलंबो : करोना विषाणूमुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती आणि ३ मे पर्यंत वाढवलेलं लॉकडाउन पाहता…बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (एसएलसी) शम्मी सिल्व्हा यांनी असा प्रस्ताव पाठविला आहे. त्यांचे बोर्ड बीसीसीआयला आयपीएल २०२० आयोजित करण्यासाठी संपूर्ण सुविधा देण्यास तयार आहे.
भारतात करोना विषाणूमुळे लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खेळाडू आणि लोकांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. बीसीसीआय, फ्रँचायझी मालक, प्रसारक, प्रायोजक आणि सर्व संबंधित संघटनांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आहे की जेव्हा परिस्थिती सुरक्षित असेल तेव्हाच आयपीएलचा हा हंगाम खेळला जाईल. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत राहू. यानंतर लगेच एसएलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी श्रीलंकेत आयपीएल २०२० आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा…
ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अॅप ग्रुपला जॉईन व्हा…