एस टी कर्मचारी आंदोलन; कर्मचारी मागण्यांवर ठाम, तोडगा नाहीच

मुंबई । विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु आहे. यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकारने संप मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी कर्मचारी माघार घेण्यास तयार नाहीत. आज उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीबरोबर एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
—–एसटी कर्मचारी संपावर ठाम
राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा सुटायला तयार नाही. विलिनीकरणासाठी नेमलेली समिती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका एस कर्मचारी संघटनांनी या बैठकीत घेतली, त्यामुळे संपाचा तिढा सुटण्याऐवजी उलट वाढला आहे.
राज्यातील एसटी कर्माचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊन एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणं करणे ही एकमेव मागणी आहे. जोपर्यंत मागणी मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

 

You May Also Like