गुढीपाडवा सणासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई – राज्यात  मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. अनेक ठिकाणी करोना रुग्णांसाठी बेड्स, व्हेंटीलेटर, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे.

लोक एकत्र आले तर करोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करावा असे राज्य शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. यासाठी सरकारने नियमावली जाहीर केलीय.

दरम्यान, सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये. तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास मनाई असणार आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like