पावसाळ्यात या पदार्थांपासून रहा दुर!

मुंबई ।  पावसाळ्यात काही पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधा, सूज येणे आणि तुमची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. यावेळी आपण कोणते खाद्यपदार्थ या हंगामात खाणे टाळले पाहिजे. हे आज आपण बघणार आहोत.

 

मशरूम : पावसाळ्यात ओलावायुक्त वातावरण असल्यामुळे मशरूमला किडे आणि जीवाणू होण्याचा धोका अधिक असतो. ओलसर हवेत बॅक्टेरिया वाढतात. बॅक्टेरियाने संक्रमित मशरूम दृश्यमान नसतील परंतु पोटात संक्रमण आणि आजार होऊ शकतात. म्हणूनच, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा.

आंबट पदार्थ : लोणचे, चटणी, आंबट कँडी, चिंचे इत्यादी आंबट पदार्थ पावसाळ्यात खाणे टाळा. अशा आंबट पदार्थांमुळे शरीरात पाण्याचे प्रतिधारण होऊ शकते. आंबट खाण्यामुळे पावसाळ्यात घसा खवखवणे आणि ताप येऊ शकतो. ज्यामुळे पावसाळ्याच्या हंगामात आंबट पदार्थ खाणे टाळा.

रोडवरील खाद्यपदार्थ : पावसाळ्याच्या हंगामात बाहेर थंडगार वातावरण असते. या हंगामात बाहेरील पदार्थ खाणे टाळा. विशेष करून रोडच्या बाजूला उघड्यावर असलेले गाड्यावरील अन्न खाणे टाळा. या अन्नावर अधिक बॅक्टेरिया असतो. आपल्याला जे पदार्थ खाण्याची इच्छा आहे. ते पदार्थ आपण घरी तयार करूनही खाऊ शकतो.

सी फूड : पावसाळ्यात हंगामात पाणी लवकर दूषित होते. मासे, कोळंबी वगैरे खाणे टाळा. बर्‍याच वेळा, सी फूड व्यवस्थित धुवून आणि शिजवल्यानंतरही संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच, जर आपल्याला या हंगामात मांसाहार खायचा असेल तर आपण चिकन आणि मटण खाऊ शकता.

You May Also Like