धुळ्यात दगडफेक; पोलिस कर्मचारी जखमी

भाजप- शिवसेना आमने सामने

धुळे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सर्वत्र निषेध होत आहे. धुळ्यात शिवसैनिकांच्‍यावतीने निषेध करण्यासाठी राणे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली होती. ही प्रेतयात्रा धुळे महापालिकेच्या समोर येताच भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर त्यांच्यामध्ये एकच जुंपली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये लाठ्याकाठ्यासह दगडफेक देखील झाली.

 

 

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसून येत आहेत. धुळ्यात देखील याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. भाजप व शिवसेना आमने– सामने आले आल्‍यानंतर दगडफेक देखील झाली.

 

भाजप– सेना समोरा – समोर आल्‍यानंतर दगडफेक झाली. यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले. याचा फटका पोलिसांना देखील बसला. दगडफेकी दरम्यान पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ पोलीस प्रशासनाचे अतिरिक्त पोलीस बल घटनास्थळी दाखल झाले. व त्यानंतर पोलीस प्रशासनातर्फे परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

You May Also Like