नंदुरबार शहरात दगडफेक; ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल

नंदुरबार ।  शहरातील बिस्मिला चौक परिसरात दोन गटात दगडफेकसह तुंबळ हाणामारी झाली. दोन युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरुन सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले आहे. घटनेत ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत.

बिस्‍मील्‍ला चौक परिसरात रात्री दगडफेक होवून हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून त्यांनी परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी तीन अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या. घटनेत ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. तर रात्रीच्या उपद्रवात दोन दुचाकी जाळण्यात आल्या होत्या.

You May Also Like