अजब! ‘भूता’नं घेतली विकेट? व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई ।  बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे  यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात एक रहस्यमयी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मॅचमध्ये स्टंपच्या जवळ बॅट्समन किंवा फिल्डर नव्हता, तरीही स्टम्पवरील बेल्स खाली पडल्या. बांगलादेशच्या इनिंगमधील 18 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला.

 

या विचित्र परिस्थितीचा तपास करण्यासाठी अंपायरची मदत घेण्यात आलीा. त्यावेळी समोर आलेल्या फुटेजमधून या घटनेचा उलगडा झाला. स्टंपवरील बेल्स हवेनं पडल्या. सैफुद्दीनचा पाय स्टम्पपासून दूर होता. या बेल्स कुणी पाडल्या याचा खुलासा काही होऊ शकला नाही.

 

मोहम्मद सैफूद्दीन स्ट्राईकवर होता. झिम्बाब्वेच्या तेंदई चतराच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर झिम्बाब्वेचं भाग्य उजळलं. सैफूद्दीननं पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना अचानक बेल्स खाली पडल्या. त्यावेळी तो खरंच हिट-विकेट झाला होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

You May Also Like