अजब प्रेम गजब कहाणी! अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली..

पुणे ।  प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकतीच प्राजक्ता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचा काव्यसंग्रह प्राजक्तप्रभाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. ग्रंथाली प्रकाशित प्राजक्तप्रभा काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून भेटीला आली आहे. मात्र आता तिच्या एका खास कवितेमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिने ही कविता केली असून त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

 

यूरोप ट्रीपमधील एका मुलासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडबद्दल चर्चा सुरू झाली होती. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते.त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच तिच्या प्रेमाची कबुली दिलीय. इतकेच नाही तर तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी कविता लिहून प्रपोज केले होते.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

 

You May Also Like