अजब….पाकिस्तानत 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना निकाह सक्ती; विधेयक सादर

कराची : पाकिस्तानमधील सिंध प्रांताच्या विधानसभेत दि.26 मे रोजी समाजातील वाईट घटना, मुलांवरील बलात्कार आणि अन्य बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी 18 वर्षांच्या प्रत्येक मुलासाठी आणि मुलीसाठी निकाह सक्ती लागू करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आलंय.

दरम्याण, मुत्ताहिदा मजलिस-ए-अमल या पक्षाचे सदस्य आणि सिंध प्रांताच्या विधानसभेचे सदस्य असलेल्या सय्यद अब्दुल रशीद यांनी निकाह सक्तीच्या प्रस्तावाचे विधेयक सादर केले. सिंध अनिवार्य निकाह अधिनियम, असे या विधेयकाचे नाव आहे. यात ज्या मुलांच्या (मुलगा / मुलगी) वयाची 18 वर्षे पूर्ण होऊनही त्यांचा निकाह होणार नाही अशांच्या पालकांनी निकाह न होण्यामागचे कारण लेखी स्वरुपात जिल्हा उपायुक्तांसमोर शपथपत्राद्वारे सादर करावे अशीही तरतूद या विधेयकात करण्यात आलीयं.

विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले तर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. समाज आनंदात राहील. समाजातील वाईट घटना, बलात्कार आणि अन्य बेकायदा कृत्य वाढत आहे. या सर्व वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी निकाह आवश्यक आहे. मुस्लिम पुरुष आणि महिलांना 18 वर्षांचे होताच निकाह करण्याचा अधिकार मिळतो. या अधिकाराची अंमलबजावणी होईल अशी व्यवस्था करण्याची जबाबदारी मुलांच्या पालकांची आहे असे सय्यद अब्दुल रशीद यांनी विधेयकात सांगितलंय.

You May Also Like