अचानक कोसळला सिलिंग फॅन, पाहा थरारक VIDEO

मुंबई |  कुटुंबातील सदस्य जेवण्याच्या जागी एकत्र यायला सुरुवात होते आणि सगळे येईपर्यंत वाट पाहिली जाते. एक कुटुंब  रोजच्यासारखं सगळी जमवाजमव करून जेवायला  बसलं असताना अचानक सिलिंग फॅन कोसळल्याची घटना व्हिएतनाममध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर  व्हायरल होत आहे. या कुटुंबातील सगळे सदस्य जमिनीवर मांडी घालून जेवायला बसले होते. यात एक लहान मुलगादेखील होता. सगळे जेवत असताना अचानक पंखा कोसळला आणि सर्वांनाच धक्का बसला.  घरातील सर्वजण गप्पा मारत जेवण करत होते. अचानक पंख्याचा आवाज झाल्यामुळे छोट्या मुलाचं लक्ष सर्वप्रथम छताकडे गेल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे.

 

 

त्यानंतर जोरदार आवाज करत पंख्याचं पातं कुटुंबाच्या मधोमध येऊन पडलं. क्षणार्धात आणि प्रचंड वेगाने हे पातं कुटुंबातील पुरुषाच्या पायापाशी येऊन पडल्याने सगळेच स्तब्ध झाले. हे पातं पडण्याचा वेग इतका होता, की काही नेमकं काय घडलं, हे समजायला काही क्षण गेले. त्यानंतर छोटा मुलगा रडू लागला.

You May Also Like