सनी साळवे खून प्रकरणातील आरोपींचा अर्ज नामंजूर

धुळे : करोना या आजाराचा धोका लक्षात घेऊन पॅरोलवर सोडण्यात यावे याकरिता सनी साळवे खून प्रकरणात तुरुंगात असलेले आरोपी यांनी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केले होते. याबाबत सुनावणी होऊन दि.27 रोजी अर्ज नामंजूर करण्यात आला. सुनावणी दरम्यान सदरचा अर्जास सरकार पक्षाकडून तीव्र हरकत घेण्यात आली.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अड.शामकांत पाटील यांनी हरकत घेतली. सुनावणी होऊन खून प्रकरणातील आरोपींनी पॅरोलवर सोडण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. आरोपी हे गेल्या तीन वर्षापासून तुरुंगात आहेत. या अगोदर आरोपींनी सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाकडे केलेले जामीन अर्ज देखील न्यायालयाकडून फेटाळण्यात आले होते.

You May Also Like