सुपरस्टार विजयला हायकोर्टाचा ‘सुपर’ दणका

 लाख रुपयांचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
चेन्नई । तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजयला मद्रास हायकोर्टानं  तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने सांगितले आहे की विजयने भरलेल्या दंडाची रक्काम तमिलनाडु मुख्यमंत्री कोव्हिड रिलीफ फंड मध्ये जमा करण्यात येणार आहे. हायकोर्टानं हा दंड विजयला त्याच्या लग्जरी इंपोर्टेड कार रॉल्स रॉयस घोस्टचा एंट्री टॅक्स न भरल्याबद्दल ठोठावला आहे. दंड सुनावताना कोर्टानं विजयला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार विजयला गाडीचा टॅक्स कर विभागाला 2 आठवड्याच्या आत भरावा लागणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

मद्रास हायकोर्टाचे जस्टिस एसएम सुब्रमण्यम यांनी विजयला टॅक्स चोरी केल्याप्रकरणी हा दंड सुनावला आहे. सोबतच ऑर्डर देताना म्हटलं आहे की, जे फॅन्स अभिनेत्यांना खऱ्या आयुष्यात एका हिरोप्रमाणे पाहतात, असे अभिनेते तमिलनाडु सारख्या राज्याचे शासक बनले आहेत. चित्रपटात काम करणाऱ्या हिरोकडून टॅक्स चोरी करणार अशी अपेक्षा नाही. कारण, हा ॲटीट्यूड अँन्टी नॅशनल आणि असंवैधानिक आहे, असं कोर्टानं म्हटलं आहे.

हायकोर्टानं ऑर्डर देताना म्हटलं आहे की, एकीकडे सामान्य लोकांना टॅक्स देण्यासाठी आणि न्यायपूर्ण जीवन जगण्यास जागरुक करण्यात येते. तर दुसरीकडे धनवान आणि प्रतिभावान लोकं टॅक्सचोरी करतात. अभिनेत्यानं त्यांच्या लाखो चाहत्यांच्या भावना समजायला हव्यात, जे लोक तिकिटं खरेदी करुन त्यांचे सिनेमा पाहतात, अशा शब्दात कोर्टानं विजयला झापलं आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेजला  आणि  टि्वटरवर  आम्हाला फॉलो करा…

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

 

You May Also Like