जिल्हाभरात अवैध धंद्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पाठबळ

वंचित बहुजन आघाडीचा आरोप
धुळे : शहरासह जिल्ह्यात अवैध धंद फोफावले असून याच्याशी पोलिसांचे लागेबांधे आहेत, स्थानिक पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाच अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. एलसीबीच्या भ्रष्ट कारभाराव कठोर करावाई जिल्हाधिकारी संजय यादव यांनी करावी, अशी मागणी करीत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी यादव यांना एक निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, धुळे शहर व जिल्ह्यात वाढते अवैध धंदे त्यामुळे व पोलीसांचे लागेबांधे असल्यामुळे शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसायांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राजरोस पणे सट्टा व गुटखा, गॅस भरण्याचे पंप, गांजाचे दुकाने गावठी दारु तरास विकले जात आहे. या सर्व अवैध व्यवसाय पोलीसांची संगमताने सुरु आहेत.

स्थानिक पोलीस स्टेशन आणि गुन्हे अन्वेषण शाखा त्यांच्या कडून मोबदला घेतला जातो. त्यामुळे शहराभरात गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. व राजरोस पणे दिवसाढवळ्या चोर्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. याला स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत हेच जबाबदार आहे. तरी स्थानिक गुन्हेअन्वेषन शाखेतून त्यांची बदली करण्यात यावी सदर शाखेत कार्यक्षम अधिकार्याची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

गुन्हेगारांना सोडून बनावट माणसाला आरोपी करून मुळ गुन्हेगारास सोडून मोबदला हित संबंध जपले जातात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अशा भ्रष्ट कारभाराविरोधात कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल. असा इशाराही देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. चक्षुपाल बोरसे, माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव, योगेश जगताप, किशोर पाटील सुनिल जेधे आदी उपस्थित होते.

You May Also Like