सुरतच्या व्यापार्‍याचा धारदार शस्त्राने खून करणार्‍या संशयितांना अटक

नंदुरबार पोलीसांनी सुरतमध्येच ठोकल्या बेड्या
नंदुरबार : नवापुर शहरातील बीएसएनएल ऑफिसच्या पुढे धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मधोमध एक गुजरात पासींगची कार दिसुन आल्याने स्थानिक नागरीकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत कळविल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नवापुर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट घेवुन महामार्गाच्या मधोमध उभ्या असलेल्या कारची पाहणी केली असता कारच्या मागच्या सीटवर एका इसमाच्या हाता पायावर व तोंडावर धारधार शस्त्राने वार करुन तोंडावर प्लॅस्टिक चिकटपट्टी चिकटवुन त्याला जिवेठार मारल्याची घटना घडली होती. गेल्या सहा दिवसांपासुन पोलीस मारेकर्यांच्या मागावर होते. अखेर संशयिताना शिताफीने पकडून बेड्या ठोकल्याची कारवाई नंदुरबार पोलिसांनी केली आहे.

या घटनेबाबत नवापुर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक धिरज प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीताविरुध्द् खूनाचा गून्हा नोंदविण्यात आला. तसेच घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थाकिन गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.देवराम गवळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन मा.पोलीस अधीक्षक नंदुरबार महेंद्र पंडीत यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन गून्हा उघडकिस आणण्यासाठी सुचना दिल्या. मयत कोण ? त्याला जिवेठार मारण्याचा उद्देश काय व मारेकरी कोण प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान पोलसांसमोर होते. मयताच्या खिशात ऑनलाईन जेवणाची ऑर्डल दिल्याची पावती होती व त्या पावतीवर त्याचा मोबाईल नंबर होता त्यावरुन मयताची ओळख पटविण्यात पथकाला यश आले होते. मयत हा भावेशभाई सी.मेहता रा. घनश्यामभाई सोसायटी, सुरत गुजरात राज्य असल्याचे समजुन आल्याने मयताच्या घरी सदर घटनेबाबत कळवुन मयताची खात्री करण्यासाठी त्यांना नवापूर येथे बोलविण्यात आले होते.

मयताच्या भावाने त्यास ओळखल्याने मयताची खात्री झाली होती. गुन्ह्याचा पहिला टप्पा पार करण्यात पथकाला यश आले होते, परंतु मयत सुरतहुन नवापुर येथे का आला व त्याचे मारेकरी कोण ? का मारण्यात आले ? हे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे होतेच, म्हणून पोलीसांनी घटनेच्या आजु-बाजुच्या परीसरात तसेच नवापूर शहरातुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व हॉटेल, लॉजेस, पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. त्यात दि. 16/06/2021 रोजी नवापूर शहरातील हॉटेल कुणाल येथे मयत व त्यासोबत इतर 5 ते 6 इसम हॉटेलमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसले तसेच दिनांक 17/06/2021 रोजी म्हणजेच घटनेच्या दिवशी नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल उरविशा येथे देखील ते 5 ते 6 संशयीत आरोपी दिसून आल्याने आरोपी निश्चीत झाले.

 

यांनी बजावली मोलाची भुमिका
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, मा.उप-विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी, नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सह.पोलीस निरीक्षक धिरज महाजन, संदीप पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, रविंद्र पाडवी, प्रमोद सोनवणे, मुकेश तावडे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश वसावे, विशाल नागरे, जितेंद्र ठाकुर, दादाभाई मासुळ, राकेश मोरे, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे पोलीस अमंलदार राजेंद्र काटके यांचे पथकाने केली आहे.

You May Also Like