सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्निल लोणकरचा बळी

अभाविपतर्फे निषेध
धुळे : सरकारच्या नाकर्तेपणाने स्वप्निल लोणकरचा बळी घेतला आहे. असा आरोप करीत अभाविपच्या वतीने शहरात निषेध करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणार्‍या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने वयाच्या चोविसाव्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली. अभाविप तर्फे स्वप्निल लोणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत व त्यांच्या कुटुंबीयां प्रति सहानुभूती व्यक्त करत अभाविपच्या वतीने निषेध करण्यात आला.

शासनाच्या नाकर्तेपणामुळे दोन वर्षांपूर्वी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील स्वप्निल सारखे अनेक विद्यार्थ्यांना अध्याप नोकरी मिळाली नाही. काही महिन्यापूर्वीच एमपीएससीच्या विषयाला घेऊन पुण्यासह संपूर्ण राज्यात आंदोलन झाले परंतु या आंदोलन नंतर देखील राज्य शासनाने स्पर्धापरीक्षा देणार्‍या उमेदवारांबाबत गंभीर नाही या घटनेवरून लक्षात येते. अभाविप तर्फे स्वप्निल लोणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत व त्यांच्या कुटुंबीयां प्रति सहानुभूती व्यक्त करत अभाविप च्या वतीने निषेध करण्यात आला. धुळे शहर मंत्री भावेश भदाने, आदिती कुलकर्णी, वैष्णवी मराठे आदिनाथ कोठावदे, निशांत शिंदे अनुज वाघ, चेतन अहिरराव उपस्थित होते.

..अखेर स्वप्निलचे स्वप्न भंगले
महाराष्ट्र लोेकसेवा आयोगाची परिक्षा दिल्यानंतर शासकीय नोकरीचे ध्येय उराशी बाळगलेल्या स्वप्निल लोणकर या युवकाचे स्वप्न शासनाच्या थंड कारभारामुळे भंगले. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून ध्येय गाठणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्निलचा समावेश होता. दोन वर्षापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होवूनही स्वप्निल आपल्या स्वप्नांपासून दूरच होता. शासनाच्या थंड कारभाराला वैतागलेल्या स्वप्निलने गळफास घेवून जीवन यात्रा संपवली. यशस्वी परिक्षार्थींची मानसिकता खराब होऊ नये, यासाठी शासनाने काळजी घ्यावी.

You May Also Like