धुळ्यात नारायण राणेंची प्रतीकात्मक प्रेतयात्रा

धुळे । केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांकडून धुळ्यात शिवसैनिक आक्रमक झाले असून राणेंची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.  केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवार केलेल्या व्यक्तव्यचा निषेध म्हणून राज्‍यभरात पडसाद उमटत आहेत. वक्‍तव्‍याचा निषेध करत नारायण राणे यांना अटक करावी; अशी मागणी सर्वत्र होत आहे.  तक्रारीनंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी राणे यांना अटक करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली 

नारायण राणे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत शिवसेनेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. संतप्‍त शिवसैनिकांनी नारायण राणे यांची प्रतिकात्‍मक प्रेतयात्रा काढली. तिरडी तयार करून त्‍यावर राणे यांची प्रेतयात्रा काढली.

You May Also Like