भारताच्या हिताचा विचार करून पावले उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला

नवी दिल्ली । अफगाणिस्तानमध्ये  तालिबानची  सत्ता येऊन आता दोन आठवडे झाले आहेत. अमेरिकेनं सैन्य माघारी घेण्याचा निर्णय़ घेतल्यानंतर मंगळवारी अखेरचा अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानातून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर  पूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आहे. अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारतीयांच्या हिताचा विचार करून पावलं उचलावीत, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

 

You May Also Like