3 मे पासून देशात लॉकडाऊनची चर्चा? जाणून घ्या काय आहे सत्य

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 3 मेपासून 20 मेपर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. असा मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये एका चॅनेलची स्क्रिन दिसत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. यात केंद्र सरकारने 3 मेपासून 20 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्यांनी लॉकडाऊनबाबत तयारी दर्शवली आहे. याबाबतच्या नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहे, असा दावा या फोटोतून करण्यात आला आहे.

मात्र या दाव्यामागील नेमकं सत्य काय? याच्यामागील वास्तव्य समोर आले आहे. अखेर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेने स्पष्टीकरण दिलं आहे.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात ३ मे ते २० मेपर्यंत संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली आहे, असा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचाही वापर करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णतः खोटा असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे.

You May Also Like