तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यास तीन कोटींचा तडाखा

पंचनामे पूर्ण : शेतकर्‍यांचे लक्ष मदतीकडे

नाशिक : अरबी समुद्रात आलेल्या तौत्ते चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा दिला असून १ हजार ६५२.६१ हेक्टरवरील पिके व फळबागा आडव्या झाल्या आहेत. जिल्हाप्रशासनाने युध्दपातळीवर पंचनामे पूर्ण केले असून दोन कोटी ९६ लाख ६१ हजारांचे नूकसान झाले आहे. जिल्हाप्रशासनाने हा नूकसानीचा अहवाल राज्यशासनाला पाठवला आहे. आस्मानी संकटाने हतबल झालेल्या शेतकर्‍यांच्या नजरा आता शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत…

गतवर्षीच्या निसर्ग चक्रिवादळानंतर यंदा पश्चिम किनारपट्टीवर तौत्ते हे वादळ धडकले. नाशिक जिल्ह्यातही त्याचा परिणाम पहायला मिळाला. सलग दोन दिवस सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला.

तुलनेने पश्चिम किनारपट्टीच्या जवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांना या वादळाचा तडाखा बसला. अनेक घरांची पडझड झाली. काही ठिकाणी घराचे पत्रे, कौले उडाल्याने घरांचे अंशत: नूकसान झाले. सुदैवाने जीवित व पशूहानी झाली नाही. मका, बाजरी, कांदासह भाजीपाल्याचे अतोनात नूकसान झाले.

सर्वाधिक तडाखा हा आंब‍ा, पेरु,डाळिंब या फळबागांना बसला. एकूण १ हजार ६५२ हेक्टरवरिल पिके व फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. करोना संकटातही प्रशासनाने युध्दपातळीवर नूकसानीचे पंचनामे पूर्ण करत हा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. नूकसानग्रस्त शेतकर्‍यांचे डोळे आता शासनाच्या मदतीकडे लागून आहे.

नूकसान आकडेवारी :

१) बाधित गावे – ३२२

२)बाधित शेतकरी – ८२४३

३) बागायत पिकाखालील क्षेत्र – १९.१४ हेक्टर

४) बहुवार्षिक फळ पिके – १६३३.४७ हेक्टर

५) नूकसान – २ कोटी ९६ लाख ६१ ह.

You May Also Like