टीम इंडियाच्या सुपरफॅन चारुलता पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमची सुपरफॅन चारुलता पटेल यांचे निधन झाले. त्यांनी १३ जानेवारीला अखेरचा श्वास घेतला. चारुलता पटेल विराट कोहलीची फॅन होत्या. आयसीसी वर्ल्ड कप २०१९ च्या सामन्यावेळी ८७ वर्षीय क्रिकेट फॅन चारुलता पटेल चर्चेत आल्या होत्या. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपदरम्यान चारुलता यांनी स्टेडियमवर पोहोचून टीम इंडियाला सपोर्ट केले होते. इतकेच नाही तर कर्णधार विराट कोहली ते उपकर्णधार रोहित शर्माची भेटही घेतली होती.

विराट आणि रोहितने त्यांचा आशीर्वाददेखील घेतला होता. त्यावेळी कोहलीनं चारुलता पटेल यांना पुढील सामन्याचं तिकीट देण्याचं कबुल केलं होतं आणि कोहलीनं शब्द पाळला. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीचं तिकीट कोहलीनं आज्जीबाईंना दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच उत्साहात आज्जीबाई टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या.

त्या सामन्यानंतर सोशल मीडियावर चारुलता पटेल यांचीच चर्चा रंगली होती. त्यांचं क्रिकेटप्रती प्रेम पाहून चाहतेच नव्हे तर विराट व रोहित शर्माही अवाक् झाले होते. पण, या सुपरफॅन आजीचं निधन झाल्याची मन पिळवटणारी माहिती समोर आली आहे. चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीनं ही बातमी दिली.  त्यावर लिहिलं की,”तुम्हाला कळवण्यात दुःख होतं की, आमच्या आजीनं १३ जानेवारी सायंकाळी ५.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

 

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.