‘वंदे मातरम्’ गाण्याचा टीझर रिलीज

मुंबई । जॅकी भगनानी अन  टाइगर श्रॉफने देशभक्तीपर असलेले ‘वंदे मातरम्’चे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज केले. त्यानंतर आता या गाण्याचा टीझर लाँच करण्यात आला आहे. या गीताला टाइगर श्रॉफने आवाज दिला असून हे त्याचे पहिले हिंदी गाणे आहे. या आधी त्याने गायलेली दोन इंग्रजी गाणी, कैसानोवा आणि अनबिलीबल यशस्वी ठरली आहेत. हे गाणे 10 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हे गाणे रेमो डिसूजा यांनी दिग्दर्शित केले आहे. हा ट्रॅक सर्वात मोठा आणि सर्वात बोल्ड सिंगल्स पैकी एक असणार आहे.

 

 

टाइगर श्रॉफने गायलेले वंदे मातरम् रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित, विशाल मिश्रा द्वारा रचित, कौशल किशोर द्वारा लिखित आणि अंकन सेन, जुईली वैद्य आणि राहुल शेट्टी यांच्याद्वारे कोरियोग्राफ करण्यात आले आहे.

You May Also Like