दहा लाखांच्या आतील कामे ई निविदेतून वगळणार

नाशिक : नाशिक शहरातील विकासकामांना  गती देण्याच्या उद्देशाने 10 लाखाच्या आतील कामे मजूर संस्थेला देण्याचा निर्णय महापौर सतिष कुलकर्णी यांनी लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

नाशिक महानगर पालिकेच्या ऑनलाईन सभेत नगरसेवक योगेश हिरे यांनी पत्र दिले होते. यावर जगदीश पाटील यांनी ह्या विषयी प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी केली. नगरसेवक गजानन शेलार यांनी हा नियम लागू करतांना मजूर संस्थांची तपासणी करण्याची मागणी केली.  नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांनी सांगितले की, राज्य शासनाने हा निर्णय अतिशय चांगला घेतला आहे. यामुळे विकासकामांना गती मिळणार आहे. लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी अशी सूचना केली.

शहर अभियांता संजय घुगे यांनी सांगितले की, राज्य शासनाचा हा निर्णय प्राप्त झाला आहे. त्याचबाबतचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवण्याचे काम सुरु आहे. नाशिक महानगरपालिकेची जागा 15 वर्षांसाठी महाराष्ट्र नेचरल गॅस कंपनीला देण्याबाबतचा विषय महासभेत मंजूरीसाठी येताच नगरसेवकांनी या विषय तहकूब ठेवण्याची मागणी केली. महापौरांनीही नगरसेवकांची मागणी विचारात घेवून हा विषय तहकूब ठेवला.

महापालिकेच्या विविध विभागांकडून सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याबरोबरच असलेल्या सुरक्षा रक्षकांनां सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यासाठी विषयाला मंजूरी मिळण्याचा विषय ठेवण्यात आला होता. मात्र या विषयावर महापौरांनीच सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी भरती करण्याची सुचना प्रशासनाला केली असून सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांची मुदत वाढ दिली.

नाशिकरोड विभागातील देवळालीगाव येथील स्मशानभूमीलगत विद्युत दाहिनी उभारण्याच्या 3 कोटी 88 लाखांच्या कामाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विनाअनुदानित शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचाही विषय मंजूर करण्यात आला. या महासभेत नगररचना विभागात उपसंचालकपदावर मुंबई येथून आलेल्या हर्षल बाविस्कर यांची नेमणूक झाल्याचे जाहीर करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like