केटीएचएममधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दहा हजाराची शिष्यवृत्ती

नाशिक : ब्लू क्रॉस लॅबोरेटरीस तर्फे दर वर्षी प्रमाणे केटीएचएम महाविद्यालयातील हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना शासनाची व इतर शिष्यवृत्ती मिळालेली नाही, अशा विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता व त्याची आर्थिक परिस्थिती या निकषावर विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

ह्या वर्षी संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, बी बी ए, बी.व्होक प्रिंटिंग टेक्नॉलॉजी व इंटिरियर डिझाईन विभागातील एकूण ४५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड करण्यात आली. सदर शिष्यवृत्ती सलग तीन वर्ष विद्यार्थांची पदवी पूर्ण होई पर्यंत दर वर्षी दहा हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

दरम्यान, शैक्षणिक कारकीर्दीच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या क्षमतेस ओळखून त्यांना भविष्यातील उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आम्ही ही शिष्यवृत्ती प्रदान करून प्रेरणा देत असतो, असे ब्लू क्रॉस कंपनीचे संजीव माहुली म्हणाले.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

 

You May Also Like