दिल्लीसह देशात स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट, धमकीचे पत्र

नवी दिल्ली । दिल्लीसह देशात स्फोट घडवून आणण्यात येईल, असे पत्र दिल्ली पोलिसांना मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आधी राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवादी संघटनेचा कट होता . या कटाचा भाग म्हणून गाझीपूर फूल मार्केट येथे बॉम्ब स्फोट करण्याचा डावा होता, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
टेलीग्रामच्या माध्यमातून पत्र पाठविण्यात आले होते. या पत्राची जबाबदारी मुजाहिदीन गजवात उल हिंद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या पत्राच्या माध्यमातून मोठ्या हल्ल्याची धमकीही देण्यात आली आहे. अल कायदाशी कनेक्शन असलेली ही दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये सक्रिय आहे.
दिल्लीतील गाझीपूर फूल मार्केटच्या गेटजवळ 14 जानेवारी रोजी एका पिशवीमध्ये आयईडी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. ही बॅग निर्जनस्थळी नेऊन बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी कसून चौकशी करण्यात आल्यानंतर मुजाहिदीन गजवात उल हिंदचे नाव पुढे आले.
‘दिल्लीतील गाझीपूर मार्केटमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची योजना होती. त्यानुसार 14 जानेवारी रोजी तिथे आयईडी ठेवण्यात आला होता. काही टेक्निकल कारणांमुळे हा स्फोट झाला नाही. मात्र, पुढच्यावेळी असे होणार नाही. अधिक योजनाबद्धपणे आम्ही स्फोट घडवून आणू आणि या स्फोटाने संपूर्ण भारताला धडा मिळेल, असे या पत्रातून धमकी देण्यात आली आहे. पंजाबमध्ये आरडीएक्स व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. त्याची पेरणीसुद्धा याच दहशतवादी संघटनेने केली होती, असे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या पत्राची सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतली आहे. देशात अर्लटजारी करण्यात आला आहे.

You May Also Like