पश्चिम महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्याची लेक होणार ठाकरेंची सून!

मुंबई । पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार याच्यासोबत होणार आहे. यामुळे हा लग्नसोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराचा घरचा लग्नसोहळा आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या घरी जावून भेट घेतली.
सुरुवातीला ही भेट राजकीय असल्याचे वाटत होते. पण आपण मुलीच्या लग्नाचे आमंत्रण आणि लग्नपत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटायला आलो होतो असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.

You May Also Like