पवारांच्या मेहरबानीवर ठाकरेंचे सुरू, राज्यपाल चुकतील असे वाटत नाही; राणेंचा दावा

नाशिक । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी नाशिकमध्ये जोरदार टोलेबाजी केली. पवारांच्या मेहरबानीवर तुमचे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, असा दावा त्यांनी केला. विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. राणे म्हणाले, ते मंत्रालयात जात नाहीत, कुठे जात नाहीत. टीका काय करता, टोमणे काय मारता. मराठी तरुण आज उध्वस्त होतोय. इथली मुले वसई विरारच्या पुढे गेले. तिथे मोठ्या इमारती झाल्या. तिथे यांची पार्टनरशीप आहे. यांचे वाचन तरी आहे का. पवारांची मेहेरबानी. त्यांनी जमवाजमव केली आणि सगळे केले, असा दावा त्यांनी केला.
—–राऊतांच्या मनात काय?
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत चांगली सुरुवात करत आहेत. मात्र, त्यांचापेक्षा जास्त लोकांची यादी माझ्याकडे आहे. संजय राऊत यांनी यादी दिली, तर मी देखील देणार. संजय राऊत यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची पाहिजे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
—–राज्यपाल चुकतील वाटत नाही…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, राज्यपाल यांचाकडून चूक होईल असे मला वाटत नाही. मात्र, मी भाषण बघितलं नाही. त्यावर नंतर प्रतिक्रिया देईल. दिशा सालियानच्या बाबतीतही ते बोलले. ते म्हणाले, आम्ही दिशाची बदनामी केली नाही. उलट दिशाच्या कुटुंबातील व्यक्तींनी आमचे आभार मानले पाहिजेत. आम्ही न्याय मिळवून देत आहोत. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. सुशांतची हत्या झाली होती. ती आत्महत्या दाखवली. राष्ट्पटी राजवट लागू होण्याचे भविष्य सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत. ते खरे ठरो, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
—–विद्यार्थ्यांना आणणे सुरू…
केंद्रीय मंत्री राणे यांना यावेळी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी हा प्रश्न संजय राऊत यांनी विचारायला लावला का, असा प्रतिप्रश्न केला. पुढे म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांना आणले जात आहे. भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. भारत सरकारकडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याला जी असेल ती मदत केली जाईल. चांगले काम केले तर चांगले म्हणा, असे आवाहन त्यांनी केले.

You May Also Like