म्‍हणूनच जनतेत जातोय; भारती पवार यांचा मुख्‍यमंत्र्यांना लगावला टोला

नंदुरबार । कोविड नियमांचे पालन करुन आम्ही जन आशिर्वाद यात्रा करत आहोत. आम्ही घरात बसुन काम करु शकत नाही. त्यामुळे जनतेत जात आहोत; असा टोला केंद्रीय आरोग्‍य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी मुख्‍यमंत्री यांना लगावला.

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यंमत्री भारती पवार यांची जनाशिर्वाद यात्रा आज नंदुरबारमध्‍ये आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्‍या. मंत्री भारती पवार यांनी मुख्यमंत्री महोदय मला माफ करा असे म्‍हणत आम्ही जनतेत जाणार, आम्ही कुपोषण आरोग्याची माहिती घेणार. कारण मला सभागृहात उत्तर द्यावे लागते. मुख्यमंत्री आम्हाला जनतेपासुन तोडु नका; टिका करुन राजकारण करु नका असा टोला देखील त्‍यांनी मुख्यमंत्रींना लावला.

 

 

देशात आतापर्यंत ५६.६४ कोटी लोकांना लसीकरण झाले. यात सर्वाधिक लसींचे डोस महाराष्ट्राला दिले आहे. परंतु, महाराष्‍ट्र राज्यात एक लाख डोस वाया गेल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच ऑक्सिजन अभावी किती रुग्णांचा मृत्यु झाला; याबाबत केंद्राने प्रत्येक राज्याला पत्र लिहुन १३ ऑगस्टपर्यत आकडेवारी देण्यास सांगितले होते. परंतु, राज्याकडुन केंद्राला अद्यापही माहीती मिळालेली नाही.

You May Also Like

error: Content is protected !!