‘त्या’ वृद्ध शिक्षिकेला मिळाली अवघ्या काही तासांत मदत

वसई : तौत्के चक्रीवादळचा फटका वसई येथील एका वृद्धाश्रमालाही बसला. न्यू लाइफ फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमाचं चक्रीवादळानं नुकसान झालं. याच वृद्धाश्रमात राहत असलेल्या सुमन लक्ष्मीकांत रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदतीसाठी साद घेतली. रणदिवे बालमोहन विद्या मंदिरात शिक्षिका होत्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे त्यांचे विद्यार्थी आहेत. आज सकाळी राज ठाकरेंनी सुमन रणदिवेंशी फोनवरून संवाद साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शक्य तेवढी मदत वृद्धाश्रमाला केली जाईल, असं आश्वासन राज यांनी रणदिवे यांना दिलं होतं. त्यानंतर पुढील काही तासांत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली. वृद्धाश्रमातील 29 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवून दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं.

राज ठाकरेंना फोनवरून नमस्कार करताच सुमन यांनी त्यांच्याकडे आपलं गार्‍हाणं माडलं. मवादळामुळे खूप मोठं नुकसान झालंय. जास्तीत जास्त मदत कर,फ अशी विनंती सुमन रणदिवे यांनी केली. त्यावर मी अविनाश जाधव यांना सांगितलं आहे. ते नक्की मदत करतील. तुम्ही काळजी करू नका, असं आश्वासन राज यांनी दिलं. यावेळी कुंदा कशी आहे, अशी विचारणा रणदिवेंनी केली. त्यावर आई बरी आहे असं उत्तर राज यांनी दिलं.

दरम्याण, राज ठाकरेंनी सुमन रणदिवे यांना मदतीचं आश्वासन दिल्यानंतर अमित ठाकरेंनी परिसरातील मनसेच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांना सूचना केल्या. त्यानंतर थोड्याच वेळात वृद्धाश्रम परिसरात मदत पोहोचली. तू मध्यंतरी इथे आला होतास. पण आपली भेट झाली नाही. एकदा मला भेटायला ये ना, असं म्हणत रणदिवेंनी राज यांच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लॉकडाऊन संपू दे. नक्की भेटायला येतो, असा शब्द राज यांनी रणदिवे यांना दिला. तब्येत ठिक आहे ना, अशी विचारपूस राज यांनी केलीयं.

You May Also Like

error: Content is protected !!