जगभरात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे

मुंबई : आज जगभरात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी करोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळतं असंही यावेळी त्यांनी सांगितले.

सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाइन शाळा सुरू आहेत. क्लास सुरू होण्याआधी अनेक शिक्षक मुलांकडून 15 मिनिटे योग करून घेतात त्यामुळे मुलांची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना विरूद्धच्या लढाईत हा खूप चांगला उपक्रम असल्यांचही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आज जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असे नरेंद्र मोदींनी सांगितले. आता जगाला M-Yoga अॅपची शक्ती मिळणार असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितले. या अॅपमध्ये कॉमन योग प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडिओ जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील. जेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हा हाच उद्देश होता की, योग पूर्ण जगात सुलभ पद्धतीने पोहचावा.

You May Also Like