चिडलेल्या हत्तीने मगरीला पाण्यातच केले चितपट

नवी दिल्ली । चिडलेल्या हत्तीने पाण्यातच केले मगरीला चितपट केले. हत्ती पाण्यात मगरीला हरवू शकतो यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. या व्हिडिओसंदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हत्ती आणि मगरीची झटपट सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

 

 

अरुणाचल प्रदेशच्या आयपीएस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. जे अत्यंत धोकादायक आहे. आयपीएस एचजीएस धलीवाल यांनी या व्हिडिओसह कॅप्शनही लिहिले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – जो शक्तिशाली आहे तो जगू शकतो, हा जंगलाचा नियम आहे.

 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हत्ती खूप चिडलेला आहे. त्याचा राग इतका खतरनाक आहे की त्याने मगरीला पाण्यातच चितपट केले. जंगलाचा नियम असा आहे की जो मजबूत आहे तोच जंगलात राज करु शकतो. पाण्यात मगरी मजबूत असल्या तरी हत्ती समोर ती कमकुवत दिसत आहे. हत्तीने आपल्या सोंडेने मगरी चांगलेच पछाडले आहे.

 

 

You May Also Like