ओव्याच्या पानांचे फायदे

नमस्कार मित्रांनो, स्वयंपाक घरातील मसालायच्या डब्यात असणारी ओवा जितकी गुणकारी तितकेच तिचे पानंदेखी तितकीच गुणकारी आहेत. मऊसर हिरवी दिसणारी ही पानं अनेक आजारांवर गुणकारी आहे.

ओव्याप्रमाणेच त्याच्या पानांचे गुणधर्म व फायदे कोणते ते पाहुयात :

बॉडी डिटॉक्स होते – ओव्याची पानं हे एक उत्तम नैसर्गिक डिटॉक्स आहे. या पानांचा काढा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे थोडी ओव्याची व तुळशीची पानं एकत्र करुन त्याचा काढा तयार करावा. त्यानंतर त्यात २-३ थेंब लिंबाचा रस मिक्स करावा व हा काढा घ्यावा. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासोबतच शरीराचं हायड्रेशनदेखील होते.

पोटदुखी दूर होते – साधारणपणे कधीही आपलं पोट दुखू लागलं की आपण ओवा खातो. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरी ओव्याचं झाड असेल तर ओव्याऐवजी त्याची पानं खा. या पानांमुळे पोटदुखी दूर होण्यासोबतच गॅस्ट्रोइंटेस्टइनची समस्यादेखील बरी होते.

पचनक्रिया सुधारते – आपलं अन्नपचन जर नीट झालं नाही तर अनेक शारीरिक समस्या डोकं वर काढतात. यात पोटदुखी, अॅसिडिटी, जळजळ, पित्त होणे अशा समस्या हमखास होतात. त्यामुळे दिवसातून एकदा तरी ओव्याचं कोवळं पान खावं.त्यामुळे पचनक्रिया सुधारते व भूकदेखी वाढते.

तोंडाची दूर्गंधी – याने दूर होते. दिवसभर आपण अनेक वेगवेगळे पदार्थ खात असतो. त्यामुळे सहाजिकच हे अन्न कण दातांमध्ये अडकून तोंडाला दुर्गंधी येते. म्हणूनच ही दुर्गंधी दूर करायची असेल तर दररोज जेवण झाल्यावर ओव्याचं पान खावं.

सर्दी-खोकला – सर्दी किंवा खोकला झाल्यास ओव्याची ७-८ पानं घेऊन ते एक ग्लास पाण्यात उकळवावीत. त्यानंतर हे पाणी अर्धा ग्लास होईल इतकं आटवावं. त्यानंतर हे पाणी गार झाल्यावर गाळून त्यात मध टाकून प्यावं.

तोंडातील दुर्गंधी – यापासून मुक्त होण्यासाठी जेवणानंतर ओव्याची पाने खा. हिरड्यांमध्ये हानिकारक जीवाणूंचा सामना करून ही पाने हिरड्या निरोगी ठेवतात.

लहान मूलांचे आजार – जर मुल वारंवार आजारी पडत असेल तर त्याला दररोज सकाळी थोड्याशा मधा बरोबर ओव्याची पाने दिली जाऊ शकतात. हे मुले आणि अर्भकांच्या प्रतिकार शक्तीस चालना देऊ शकते आणि सामान्य सर्दी, ताप आणि अपचना विरोधी प्रतिकारक बनवते. या पानांमध्ये असलेले थायमॉल धोकादायक जंतू आणि संक्रमण दूर ठेवण्यास मदत करते.

संधिवात – वेदना कमी करण्यासाठी ओव्याची पाने फायदेशीर मानली जातात. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म वेदना आणि जळजळ पासून आराम देतात. ही पाने बारीक करून पेस्ट बनवा आणि बाधित भागावर लावा. यामुळे वेदना कमी होतील.

फुफुस आजाराची समस्या – अशा लोकांनी ओव्याच्या पानांच नेहमी सेवन करावे. याच्या पानामध्ये एंटीऑक्सीडेंट तत्व असतात. यामुळे तुमच्या फुफुसला कार्यक्षम करण्यामध्ये हा फार मोठा हातभार लावत असतो.

निरोगी शरीर – ओव्याचा चहा पिल्याने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत मिळ ओव्याचे आठ-दहा पाणी तोडून गरम पाण्यामध्ये उकळावे आणि हे पाणी प्यावे. पाण्यामध्ये देखील टाकू शकतात यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होईल व ओव्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन, लेटेन मॅग्नीज, आयर्न असे पदार्थ देखील असतात. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो.

हाडांची सूज – अनेक लोकांना हाडांवर सुजण्याची समस्या असते. अशा लोकांनी ओव्याचा पाण्याचा ज्युस करून घ्यावा. असे केल्याने हाडांची असूनही कमी होते. गरम पाणी करावे. त्यामध्ये ओव्याचे काही पाने टाकावे आणि हे द्रव्य पिऊन घ्यावे. चव बदलण्यासाठी आपण यामध्ये मधाचा उपयोग देखील करू शकता

मांस पेशी – अनेक लोकांना मास पेशी दुखण्याची समस्या असते. त्या लोकांनी एका टबमध्ये गरम पाणी करावे. यामध्ये आठ दहा पाने टाकावे आणि त्यामध्ये पाय सोडून अर्धातास बसावे. यामुळे आपल्याला चांगला आराम पडतो. असा प्रयोग किमान महिनाभर करावा. यामुळे आपल्या नक्कीच फरक पडेल.

लघवीची समस्या – अनेक लोकांना लघवीची समस्या मोठ्या प्रमाणात असते. आपण ओव्याचे पाणी पिल्यास आपल्या ला चांगला फायदा होऊ शकतो. यामध्ये आयर्न, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ऑंटी एक्सीडेंट तत्व असतात. यामुळे याचा खूप मोठा फायदा होतो.

*Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचे आम्ही कुठलेही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like