काँग्रेसने लावलेला ’तो’ बॅनर भाजप खासदाराने पायदळी तुडवला

मुंबई : राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक असा वाद पेटल्याचं दिसुन येत आहे. दिल्लीनंतर मुंबईतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टरवरून मोठा वाद गेल्या काही दिवसांत सुरू आहे. आता हाच वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाहीयं. भाजपच्या काही अधिकार्‍यांनी काँग्रेसने लावलेले हे पोस्टर फाडून पायदळी तुडवले आहेत.

याप्रकरणी याचा एक व्हिडिओदेखील भाजपकडून शेअर करण्यात आलायं. यामध्ये भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी देशविरोधी ’टूलकिट’मधून प्रेरणा घेतलेले काँग्रेसचे बॅनर फाडून फेकले आहेत.

खरंतर, आमच्यासाठी असणार्‍या लसी परदेशात का पाठवण्यात आल्या असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला होता. यावर महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांची नावंही लिहण्यात आली होती. पण हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान असल्याचं सांगत हे पोस्टर्स फाडून पायाखाली तुडवले.

You May Also Like