व्यावसायिकाच्या मुलाचे दोन कोटी रुपये खंडणीसाठी त्याच्याच मित्रांनी अपहरण

आग्रा : व्यावसायिकाच्या मुलाचे दोन कोटी रुपये खंडणीसाठी त्याच्याच मित्रांनी अपहरण करून त्याला मारून टाकले व पीपीई किटमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मुनीराज जी. यांनी सांगितले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

हॅप्पी खन्ना, सुमीत अस्वनी, मनोज बन्सल, रिंकू आणि हर्ष चौहान यांना अटक झाली. मृताचे नाव सचिन चौहान असून तो दयालबाग वसाहतीत राहायचा. त्याचे वडील एस. एस. चौहान यांचा कोल्ड स्टोअरचा व्यवसाय आहे. त्या भागातील वॉटर प्लँटजवळ असलेल्या बूझ पार्टीला ये असे सचिनला अस्वनी आणि इतरांनी २१ जून रोजी म्हटले होते. सचिन त्यादिवशीपासून बेपत्ता झाला. तो बेपत्ता झाल्याची तक्रार दुसऱ्या दिवशी दाखल झाली, असे न्यू आग्रा पोलीस ठाण्याचे प्रभारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले. सचिन चौहान याला अपहरण झाले त्याच दिवशी लॅमिनेशन पेपरने श्वास गुदमरवून मारून टाकण्यात आले.

You May Also Like