केंद्र सरकारने देशातील जनतेचे कंबरडे मोडले

दोंडाईचा येथील मेळाव्यात आ.पटोले यांचे प्रतिपादन
दोंडाईचा :  केंद्रात भाजपाचे सरकार आले आहे. तेव्हापासून नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कायदा, गँस सिलेंडर अनुदानसाठी बँकखाते उघडण्यासह इतर विविध घेतलेल्या निर्णयामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. विखरण येथील शहीद शेतकरी धर्मा पाटील यांना तत्कालीन भाजपा सरकारने उर्जा प्रकल्पात न्याय दिला नाही. भाजपाच्या काळात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली. मात्र काँग्रेस पक्षाने कधीच सत्तेचा उपयोग केला नाही. उलट भाजपा पक्ष जनतेचा शत्रू असुन लोकांना आता येणार्‍या काळात सत्तेत काँग्रेस पक्ष आणण्याची गरज असल्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.

दोंडाईचा-नंदुरबार रस्त्यावरील सौरभ मंगल कार्यालय येथे मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले होते. करोनाकाळात आशा वर्कर यांचे मोलाचे योगदान असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, दोंडाईचा शहराध्यक्ष वंसत कोळी उपस्थित होते. युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक यांच्या हस्ते आ.नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प.सदस्य हेमराज पाटील, सरपंच ज्योती देसले, सरपंच बापू भील, चंद्रकांत शिरसाठ, माजी सरपंच शिवाजी पाटील, उपसरपंच उमेश पाटील, संदिप पाटील, साहेबराव सोनवणे, अधिकार देवरे, दिनेश देवरे, दिनेश देसले, अभय पाटील, शामकांत पाटील, विरेंद्र गोसावी, रामकृष्ण धनगर, भोजैसिंग गिरासे, विश्राम खैरनार, दामू चव्हाण, आसाराम भिल, रतिलाल पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

You May Also Like