भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका

मुंबई : भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. तर धोकादायक ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकूण २१ रुग्ण सापडले आहेत. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.

आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राने ‘जिनोमिक सिक्वेसिंग’च्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० नमुने घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी ‘सीएसआयआर’ आणि ‘आयजीआयबी’ या महत्त्वाच्या संस्थांचा सहभाग यामध्ये घेतला आहे. ‘एनसीडीसी’चे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे ‘स्क्विन्सिंग’ करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण याबाबत माहिती घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे.

डेल्टा व्हेरियंट सगळ्यात आधी भारतात ऑक्टोबर महिन्यात सापडला होता. भारतात दुस-या लाटेचा कहर डेल्टा व्हेरियंटमुळेच झाल्याचा अंदाज आहे. सध्या इंग्लंडमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढतायत. फायझर आणि अॅस्ट्राझेन्काच्या लसी डेल्टा व्हेरियंटपासून संरक्षण देतात, असा दावा करण्यात आलाय.

You May Also Like