काळ्या बुरशीवरील उपचाराचा खर्च 100 पटींनी होणार कमी; पुण्याच्या डॉक्टरांनी शोधला पर्याय

पुणे : करोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. अनेकांना करोना उपचारानंतर ब्लॅक फंगसचा सामना करावा लागतोय. या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे. या रुग्णांनी लक्षणे कशी ओळखावीत हे एम्सने सांगितले आहे. मात्र, याचे उपचारही करोनासारखेच महागडे आणि औषध टंचाईचे आहेत. यामुळे पुण्याच्या डॉक्टरांनी ब्लॅक फंगसवरील उपचार पद्धतीचा कमी खर्चाचा पर्याय सुचविला असल्याने उपचाराचा खर्च आता कमी होण्यास मदत होणार आहे.

करोना नंतर ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांचा एका दिवसाचा खर्च हा जवळपास 35000 रुपये आहे. जो 100 पटींनी कमी होऊन 350 रुपये एवढाच होऊ शकतो. डॉक्टरांनी ब्लॅक फंगसवर उपचाराचा एक पर्याय सुचविला आहे. यामध्ये सावधानतेने रुग्णाच्या रक्तातील क्रिएटिनिन लेव्हलवर लक्ष ठेवावे लागणार आहे. यामुळे उपचाराचा खर्च कमी होणार आहे.

ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी वापरले जाणारे इंजेक्शन हे एम्फोटेरेसिन आहे. रेमडेसीवीर सारखीच या इंजेक्शनची देखील टंचाई आहे. इंजेक्शनची किंमत जास्त आहेच, परंतू ते सहज मिळत नाहीय. यामुळे दुसरे उपचार पद्धती वापरून यावरील खर्च खूपच कमी केला जाऊ शकतो. यासाठी दर दुसर्‍या दिवशी रुग्णाची रक्त चाचणी करावी लागणार आहे.

You May Also Like