बीडमध्ये 78 रुग्ण असलेल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन साठा संपला

बीड  : आज दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  तर बीडमधील परळीच्या कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपला असल्याची धक्कादायक बाबसोर आली आहे.

बीड जिल्ह्यात करोना संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. जिल्ह्यामध्ये दोन हजाराच्या वर ऑक्सिजनवर असणारे रुग्ण आहेत. या रुग्णाला लागणारे ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. मात्र, सर्व ठिकाणाहून टंचाई भासत असल्याकारणाने प्रशासन हतबल झाले आहे.

दिवसेंदिवस करोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. परळी येथील कोविड सेंटरमधील ऑक्सिजन साठा संपल्याने रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. शेवटचे 39 सिलेंडर शिल्लक आहेत तर 78 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येत आहे. त्यामुळे नवीन रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया आता ठप्प झाली आहे.

You May Also Like