निष्काळजीपणाचा कळस! उंदराने कुरतडला नवजात बाळाचा पाय

नवी दिल्ली : देशभरात करोनाने थैमान घातले आहे. देशातील सर्वच रुग्णालयात बाधितांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतांना धक्कादायक घटना घडण्याचे प्रमाणातही वाढ होत आहे. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणाने एका सरकारी रुग्णालयामध्ये उंदराने बाळाचा पाय कुरतडल्याचा प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

महाराजा यशवंतराव चिकित्सालय (एमवायएचचे) अधीक्षक प्रमेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या रुग्णालयामध्ये लहान मुलांची देखभाल करण्यासाठी जो कक्ष आहे तिथे एका बाळाचा पाय उंदाराने कुरतडल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळाची टाच आणि अंगठा उंदराने कुरतडला असून या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. समिती स्थापण करून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका प्रशासकीय अधिकार्‍याचा समावेश असल्याचं देखील म्हटलं आहे. एमवायएचच्या अधीक्षकांनी ज्या बाळासोबत हा प्रकार घडला त्याची माहिती दिलेली नाही.

You May Also Like