चक्रीवादळाने राज्यभरात आतापर्यंत 5 बळी; पुढील काही तास धोक्याचे!

मुंबई : राज्यात तौत्के चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वार्‍यामुळे मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रातील तौत्के चक्रीवादळामुळे ५  जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात ३ तर जळगावात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलं आहे.

पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वार्‍यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं आएमडीनं सांगितलं आहे. वार्‍याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी १२० किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भेंडखोल येथे समुद्र उधणलेला आणि जोरदार वारे वाहत आहेत. याशिवाय रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पेक्षाही भयानक स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे रायगडवासी चिंतेत असून मागच्या निसर्ग वादळाच्या आठवणी अजूनही ताज्या असताना या चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे.

You May Also Like