ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल…! निलेश राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई: राज्यात करोनाचं सावट गडद होऊ लागलेलं असतानाच दुसरीकडे राजकीय सुंदोपसुंदी देखील तेवढ्याच वेगाने सुरू आहे. भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान,  “तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. विचार करून बोललं पाहिजे”, असं निलेश राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

निलेश राणेंनी ट्वीट करून म्हटलंय कि,  “अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपाचे आमदार येतात ते पाहा. पवार साहेब, ते तुमच्याकडे नाही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी आमदार सोडा नारळपाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. विचार करून बोललं पाहिजे”, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसताना अनेकदा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील भाजपाकडून थेट लक्ष्य केलं जात आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like