CoronaVirus : ‘जसलोक’ पूर्णत: ‘कोविड रुग्णालय’ करण्याचा महापालिकेचा निर्णय मागे

मुंबई : देशासह राज्यातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट च होत चालली आहे. दरम्यान मुंबईतील करोना परिस्थितीही अतिशय भयावह आहे.दरम्यान,   जवळपास दहा हजारांच्या आसपास दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं बेड मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. बेड उपलब्ध व्हावेत यासाठी महापालिकेनं उपाययोजना हाती घेतल्या असून, हॉटेल्समध्येही क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहेत. यातच दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील जसलोक रुग्णालय संपूर्णत: करोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. काही तासांत हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

जसलोक रुग्णालय संपूर्णत: करोना रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णयामुळे जसलोक रुग्णालयात करोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना दाखल केले जाणार नव्हते. तसेच सध्या असलेल्या करोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांनाही इतर रुग्णालयांत हलविण्यात येणार होते. शनिवारी सकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच महापालिकेनं आपला निर्णय मागे घेतला आहे.

You May Also Like