चालकाच्या प्रसंगावधनाने 30 प्रवाशांचा वाचला जीव

तेलंगाणा | इतर सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या चालकांना तर विशेष खबरदारी घ्यावी लागते. कारण, अनेक लोकांना सोबत घेऊन ते दररोज प्रवास करत असतात. सध्या अशीच एक घटना समोर आली असून यात बसनं पेट घेताच चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 30 प्रवाशांचा जीव वाचला आहे.

 

 

सदरिल घटना तेलंगणा येथील हैदराबाद इथली आहे. या घटनेत तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस हनमकोंडा इथून हैदराबादकडे निघाली होती. मात्र, ही बस घानपूरजवळ पोहोचताच तिच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. बघता बघता संपूर्ण बसनंच पेट घेतला. या बसमधून 30 प्रवाशी प्रवास करत होते. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरवण्यात आलं.

 

 

 

 

You May Also Like